छत्तीसगडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या

रायपूर – छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावल्यात. पंतप्रधान मनमोहन सिंग यांची रायपूरमध्ये सभा झाली. रायपूरमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अजित जोगी यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी ही सभा घेतली होती. तर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींच्या तीन ठिकाणी सभा आहेत. त्यांची पहिली सभा विलासपूरमध्ये झाली.

लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराजसुद्धा आज छत्तीसगडमध्ये आहेत. दरम्यान, छत्तीसगडचा अबुजमाड परिसर माओवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माओवाद्यांच्या देशभरातल्या हिंसक कारवाया नियंत्रित होणार्या या भागात 225 गावं असून माओवाद्यांनी या भागात निवडणूक बंदीचं फर्मान सोडलं असून या भागात जाण्याच्या मार्गावर माओवाद्यांनी लाकडी दरवाजा उभा केलाय. माओवाद्यांनी या निवडणुकींवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केले आहे.

Leave a Comment