खेडा – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस सरकारला आपल्या टीकेचे लक्ष्य केल आहे. देशाचा इतिहास आणि भूगोल बदलण्याचे काम काँग्रेसने केले आहे. अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.

गुजरातच्या खेडामधल्या मुस्लिम ट्रस्टच्या हॉस्पिटल उद्घाटनाप्रसंगी मोदी बोलत होते. पंतप्रधान छत्तीसगढमध्ये महागाई आणि भ्रष्टाचाराऐवजी इतिहास आणि भूगोलमध्ये जास्त रमल्याचा टोला त्यांनी लगावला. देशाचा इतिहास आणि भूगोल हा काँग्रेस सरकारमुळेच बदलला. काँग्रेसने देशाचे तुकडे केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
1857 च्या इंग्रजाविरुध्द हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येत स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात केली होती. मात्र दुर्दैवाने काँग्रेस सरकारमुळे शालेय पुस्तकांमध्ये या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख हा विद्रोह म्हणून केला जातो असेही मोदी म्हणाले.