मार्स मिशनचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा- भारताच्या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने ंमंगळाच्या दिशेने सोडलेल्या मार्स मिशन या उपग्रहाने आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केन्द्रावरून अवकाशात झेप घेतली तेव्हा भारतीयांची खरी दिवाळी साजरी झाली. मंगळवारी दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी पीएसएलव्ही २५ या प्रक्षेपक यानाने ठरल्या वेळी मार्स मिशन या उपग्रहासह अवकाशात झेप घेतली. तिरूपती येथील हवामान केन्द्राने या प्रक्षेपणाला हवामान अनुकूल असल्याचा निर्वाळा देताच या रॉकेटला बत्ती देण्यात आली.

मंगळायन या नावाने सोडण्यात आलेल्या या मोहिमेची घोषणा १५ महिन्यांपूर्वी करण्यात आली होती आणि तेव्हा पासून ५०० शास्त्रज्ञांनी रात्रीचा दिवस करून या मोहिमेला आकार दिला होता. चीनचा असा एक प्रयोग ङ्गसला होता. चीनचे मंगळावर सोडण्यात येणारे यान झेपावलेच नाही तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारत ही मोहीम आखणार असल्याचे जाहीर केले होते. यात चीनशी चढाओढ करण्याचा काही विचार नाही असे इस्रोच्या संचालकांनी सांगितले असले तरीही या कामात भारताला चीनवर मात करण्याची इच्छा आहे असे जगात मानले जात आहे.

३५० टन वजनाचे हे रॉकेट आणि यान महिनाभर पृथ्वीला प्रदक्षिणा घालील आणि नंतर मंगळाकडे झेप घेईल. ते ३० सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत प्रवेश करील. त्याचा दुसरा आणि निर्णायक टप्पा तेव्हाच सुरू होईल. चीन सोबतच जपानलाही या प्रयत्नात यश आलेले नाही. २००३ साली त्यांचा प्रयत्न ङ्गसला. आता जपानचे शास्त्रज्ञ भारताच्या मोहिमेचा नीट अभ्यास करीत आहेत. भारताने या मोहिमेवर ४५० कोटी रुपये खर्च केला आहे. आजवर अमेरिका, रशिया आणि यूरोपीय स्पेस एजन्सी यांनाच मंगळावर जाण्यात यश आले आहे. भारताला यश आले तर तो या बाबतीत चौथा देश ठरेल.

Leave a Comment