नीता अंबानींच्या ५० व्या वाढदिवसाला २२० कोटींचा खर्च

मुंबई – भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी पत्नी निता यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तब्बल २२० कोटी रूपये खर्च केल्याचे समजते. राजस्थानातील जोधपूर येथील उमेद भवन या राजशाही व अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये दोन दिवस चाललेल्या वाढदिवस पार्टीसाठी देश विदेशातून अनेक जण उपस्थित होते असे समजते.

उमेद भवन या पॅलेसचा कांही भाग हॉटेलमध्ये बदलला गेला आहे. नीता अंबानी याच्या वाढदिवसामिमित्ताने येथे प्रथमच विशेष लाईट इफेक्टच्या सहाय्याने या हॉटेलचे रूपच बदलले गेले. त्यासाठी सिंगापूरहून खास तज्ञ आले होते. पाण्यात बनविलेल्या स्टेजवर लक्ष्मीपूजनाचा खास कार्यक्रम झाला तर शिवकाशी येथून आलेल्या पथकाने नेत्रदिपक आतषबाजी केली. मुंबईच्या टीमने लाईटींग सांभाळले होते तर थायलंड मधून आणल्या गेलेल्या फुलाचे डेकोरेशन करण्यासाठी थायलंड आणि लंडन येथून तज्ञ आले होते.

या वाढदिवसाला २४० खास पाहुणे आमंत्रित होते.त्यात सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, आमीरखान, रणबीरकपूर, आदित्य ठाकरे यासारखे अनेक नामवंत होते. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने खास कार्यक्रम सादर केला. या पार्टीसाठी ३२ चार्टर विमानांतून पाहुणे आले होते असेही समजते.

Leave a Comment