लष्कर विभागाकडून चीन – भारतात हॉटलाईन सेवा

बिजिंग – चीन आणि भारत यांच्यात सीमा प्रश्नावरून शांतता राखली जावी यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या चीन भेटीत नुकताच सीमा सुरक्षा करार करण्यात आला. त्यानुसार आता दोन्ही देशातील लष्कर विभागात हॉटलाईन सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते यांग युआंग यांनी ही माहिती दिली.

चीन आणि भारत यांच्यादरम्यान असलेल्या ४ हजार किमी लांबीच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर – दि फॅक्टो बॉर्डररवर शांतता रहावी याला दोन्ही देशांकडून संमती दिली गेली आहे. त्यानुसार या दोन्ही देशांची लष्करे या भागात शांतता व स्थैर्य राखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार आहेत असे सांगून यांग म्हणाले की दोन्ही देशाच्या लष्कर विभागाच्या नित्य बैठका होणार आहेत. चीनी लष्कराला भारताचा विश्वास संपादन करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी हवे ते सहकार्य करण्यास चीनची तयारी आहे. याचा फायदा दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी होणार आहे.

Leave a Comment