नवी दिल्ली – दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या राज्यात जर आज निवडणुका झाल्या तर देशात कुणाची सत्ता येईल याच चित्र जवळपास स्पष्ट झालंय. जर आज निवडणुका झाल्या तर देशात कुणाची सत्ता येईल यासाठी आयबीएन नेटवर्क आणि द वीक यांच्यासाठी उडऊड ने सर्व्हे केलाय.
या सर्व्हेनुसार देशभरात एनडीएने आगेकूच केली. एनडीएला 187 ते 195 जागा मिळतील तर काँग्रेस बॅकफूटवर गेली असून 134 ते 142 जागा काँग्रेसला मिळतील. पण या निवडणुकीत तिसरी आघाडी निर्णायक ठरणार आहे. बसपा, डावे आणि सपा यांच्या वाट्याला अपेक्षेप्रमाणे यश जरी मिळाले नाही तरी 543 जागांपैकी अर्ध्या जागा या याच पक्षांकडे असणार आहे. जर भाजपची सत्ता आली तर अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील.
मोदींनी पंतप्रधान व्हावं असं 48 टक्के लोकांना वाटतंय. आणि काँग्रेसची सत्ता आली तर राहुल गांधी पंतप्रधान व्हावं असं 35 टक्के लोकांना वाटतंय तर मनमोहन सिंग यांना फक्त 8 टक्के लोकांनी पसंती दिलीय. तर सोनिया गांधी यांना 10 टक्के लोकांनी पसंती दिलीय. तिसरी आघाडी जर सत्तेवर आली तर बसपाच्या अध्यक्ष मायावती पंतप्रधान व्हाव्यात असं 12 टक्के लोकांना वाटतंय तर नितीश कुमार यांना फक्त 9 टक्के लोकांनी पसंती दिली.