काँग्रेसबरोबरची आघाडी कायम राहणार-शरद पवार

मुंबई : आगामी काळात राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्षांसोबतच राहणार आहे, तिसरी आघाडी वगेरे काही नसेल, आमची काँग्रेसबरोबरची आघाडी कायम राहणार आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

यामुळे तिस-या आघाडीतील राष्ट्रवादी सामील होईल या शक्यतेला आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीत तिस-या आघाडीची सभा झाली, या सभेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डीपी त्रिपाठी उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.

या पाश्बहभूमीवर शरद पवार यांच्याह वक्तव्यामुळे कॉंग्रेसला काहीसा दिलासा लाभला आहे. यावेळी राष्ट्रीवादीचे सर्वेसवा खासदार शरद पवार यांनी आपण आगामी काळात काँग्रेससोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे तिस-या आघाडीत राष्ट्रवादी सामील होईल या रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.