ऐश्वर्याला आवाज दिल्याने जया बच्चन चिडल्या

अंधेरी येथील एक पबमधील पार्टीसाठी अभिनेत्री ऐश्वर्या व जया बच्चन सहभागी झाल्या होत्या. मात्र याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना जया बच्चन यांचा रागाचा पारा चढल्यानतर काय होते याचे दर्शन सर्वांना झाले. जया बच्चन या पार्टीत सहभागी झालेल्याा फोटोग्राफरोंवर भडकल्या होत्या. भडकण्याचे कारण म्हणजे पार्टीमध्ये सहभागी झालेले फोटोग्राफर ऐश्वर्याला तिच्या नावाने आवाज देत होते.

अंधेरीतील या पार्टीत रात्रीचे साडे दहा वाजले असतील त्यावेळी काही फोटोग्राफरनी फोटोसाठी ऐश्वर्याला पोज मागतिल. त्यावेळी जया बच्चन एकदम फोटोग्राफरवर भडकल्या आणि म्हणाल्या ‘काय ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणून आवाज देत आहात, ती काय तुमच्या वर्गात शिकायला होती का’ असे म्हटल्यानंतर सर्वच फोटोग्राफर एकदम शांत झाले.
ऐश्वर्या यावेळी शांतपणे उभी होती. त्यानंतर काही वेळातच जया-ऐश्वर्या ही सासू-सूनेची जोडी लगेचच घरी रवाना झाली. पार्टीमध्ये सहभागी झालेले फोटोग्राफर मात्र ऐश्वर्याला नावाने आवाज दिल्यांनतर जया बच्चन का चिडली असेल या कारणचा शोध घेत होते. फोटोग्राफर मध्येे चर्चा होती की, ‘ऐशला मिसेज बच्चन अथवा ऐश्वर्याजी म्हणून हाक मारण्यास हवी होती.’ यापूर्वी पण एक वेळेस अभिषेक बच्चन सुध्दा मीडियावर भडकला होता.