सचिन खेळतोय शेवटचा रणजी सामना

हरयाणा – सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून मास्टर बलास्टर सचिन तेंडूलकरने काही दिवसांपूर्वीच निवती जाहीर केली आहे. रविवारी हरियाणतील लाहलीत मुंबई विरुद्ध हरयाणा या शेवटच्या रणजी सामन्यात सचिन तेंडूलकर खेळत आहे. या रणजी मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकत मुंबईचा कॅप्टन झहीर खानने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे सचिनची ही शेवटची रणजी मॅच असल्‍याने तो मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

गेल्या सिझनमध्ये फॉर्मशी झगडत असतानाही सचिन रणजी खेळताना दिसला होता. इतकेच नाहीतर गेल्या वेळी मुंबई टीमला रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहचवण्यात सचिनने मोलाचे योगदान दिले होते. विशेष म्हणजे या मॅचमध्ये सचिनने सेंच्युरी झळकावल्यास क्रिकेट फॅन्सना मोफत समोसा देण्यात येणार आहे. त्यामुळे आता शेवटच्या टेस्टआधी होणा-या रणजीमध्ये सचिनच्या कामगिरीकडे सा-याच लक्ष लागलंय. मुंबईच्या टीमसमोर पहिल्या सामन्यात हरयाणाचं आव्हान आहे.

मुंबईच्या टीममध्ये वासिम जाफर, अजिंक्य रहाणे, धवल कुलकर्णी, अभिषेक नायर सारखे खंदे शिलेदार आहेत. पण सचिन तेंडुलकर आणि झहीर खानच्या सहभागानं मुंबईची ताकद दुपटीने वाढली आहे. दरम्यान, पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत आपली अखेरची टेस्ट मॅच खेळून सचिन क्रिकेटला गुडबाय करणार आहे. आणि त्या मालिकेआधी हरयाणाविरुद्ध रणजी सामन्यात खेळून आपले हात मोकळे करणार आहे.

Leave a Comment