अंधेरीतील फिल्म स्टूडिओची तोडफोड

मुंबई : अंधेरीतील फिल्म स्टुडिओची घुसून काही अज्ञात व्यक्तिनी शनिवारी मध्यरात्री धुमाकूळ घातला. यावेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती तथा निर्माते राज कुंद्रा यांच्या सुपर फाईट लीगच या टीव्ही शोचे शुटींग सुरु असतांना हा प्रकार घडला. यामध्ये स्टुडिओ तसेच बाहेर लावलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

अंधेरीतील फिल्म स्टुडिओच्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोर अज्ञातांना अटकाव केल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. यामध्ये दोन हल्लेखोरही जखमी झाले आहेत. त्यानंतर आणखी काही कार्यकर्ते तिथ आले आणि त्यांनी स्टुडिओ तसेच बाहेर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली आहे. यामध्ये मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान कार्यकर्त्यांनी आम्ही मनसेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून पैशांची मागणी केली आणि ते न दिल्यानेच त्यांनी गोंधळ घातल्याचे राज कुंद्रा यांनी सांगितले आहे. हल्लेखोरांनी प्रवेशद्वारावर असलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तसेच हे हल्लेखोर नेमके कोण होते याचा शोध पोलीस घेतायेत.

Leave a Comment