पाटण्यात सात बॉम्बस्फोट, 5 ठार, 50 जखमी

पाटणा – पाटणा शहरात आज सकाळपासून एकूण सात बॉम्बस्फोट झाले. त्यात 5 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 50 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर एनआयएची सात सदस्यांटी टीम पाटण्याला रवाना झाली आहे. पाटणा रेल्वे स्टेशनवर नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता. या स्फोटांची तीव्रता फार मोठी नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

शहरातील पहिला स्फोट हा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्ममधील शौचालयात झाला, यात एक जण जखमी झाला, मात्र त्यानंतर उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यानंतर शहरात आणखी स्फोट झाल्याची बातमी आली. पाटण्यातील गांधी मैदानाजवळ पाच बॉम्बस्फोट झाले.

दरम्यान आज पाटण्यात नरेंद्र मोदी यांची सभाही पार पडली, यावेळी नरेंद्र मोदी यांनी सभेत कार्यकर्त्यांना शांती राखण्याचं आवाहन केलं. पाटण्यात मोदींच्या सभेच्या ठिकाणी आज सकाळपासून पाच स्फोट झाले. सभा सुरू होण्याच्या आधी हे स्फोट झाले. ही माहिती बिहारच्या पोलिस महासंचालकांनी दिली. पाटण्यातील नरेंद्र मोदी यांची सभा शांततेत पार पडली.

Leave a Comment