हिंदुहृदयसम्राट नाव देणे हा जनतेच्या पैशाचा अपव्यय – मलिक

मुंबई – मुंबई महानगरपालिकेने जोगेश्वरी येथे उभ्या केलेल्या रूग्णालयाला(ट्रॉमा केअर) हिंदुहृदयसम्राट असे नाव देणे हा जनतेच्या पैशाचा अपव्यय असून शिवसेना-भाजपाच्या राजकारणासाठी त्याचा वापर होऊ नये. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी कांदिवली येथील एमसीएच्या क्रिकेट संकुलाला सुनिल गावस्कर यांचे नाव देण्याची सूचना पुढे करणे म्हणजे शिवसेनेच्या पोटात असणारी सचिन तेंडुलकरांच्या विषयीची मळमळ व्यक्त होणे आहे. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अथवा प्रबोधनकारांचे नाव कोणत्याही रुग्णालयाला देण्यास मुळीच हरकत नाही. मात्र, त्या नावात हिंदुहृदयसम्राट असा शब्द असणे हा राजकीय प्रचार आहे. अशी टीका त्यांनी केली.

त्याचप्रमाणे कोणत्याही सुविधा, डॉक्टर नेमलेले नाहीत. तसेच एक्सरे, एमआरआय अशी यंत्रणा बसलेले नसताना सुरु केलेले हे रुग्णालय म्हणजे मृत्यूचा सापळाच बनणार आहे. असा इशारा त्यांनी दिला. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्या ट्रॉमा केअरच्या उध्दघाटनप्रसंगी एटीएम म्हणजेच आठवले-ठाकरे-मुंडे ही युती कायम आहे. असे उद्गार काढले होते. मात्र, एटीएम म्हणजे या रुग्णालयासंदर्भात ऑल टाईम मृत्यू असा अर्थ असल्याची टीका करत त्यांनी मुंडे यांना चांगलाच टोला लगावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्लेकर यांनी कांदिवली येथील एमसीएच्या क्रिकेट संकुलाला सुनिल गावस्कर यांचे नाव देण्याची सूचना पुढे करणे म्हणजे शिवसेनेच्या पोटात असणारी सचिन तेंडुलकरांच्या विषयीची मळमळ व्यक्त होणे आहे.

गावस्कर हेही मोठे क्रिकेटपटू आहेतच, पण सचिनचे नाव मोठे होण्याआधी सेनेचे मनोहर जोशी हे एमसीएचे अध्यक्ष होते. तेव्हा का नाही गावस्करांचे नाव देण्याचे सुचले. मुंबई मनपा सेनेच्या ताब्यात आहे आणि त्याचे वार्षिक अंदाजपत्रक तब्बल 28 हजार कोटी रुपयांचे आहे. त्यांनी शंभर दोनशे कोटी खर्चून तीन-चार जिमखाने गावस्करांच्या नावे उभे करावेत. त्याला कोणाचीच हरकत नसेल. असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला. तेंडुलकरांनी वारंवार शिवसेनेच्या राजकारणाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मी मुंबईकर सारखी मोहीम मध्यंतरी घेतली जात होती तेव्हा तेंडुलकरांनी राष्ट्रीय भूमिका मांडली होती. त्या सा-या बाबतची सेनेची मळमळ आता बाहेर पडत आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Leave a Comment