विदर्भातील शेतकर्‍यांसाठी 985 कोटींचे विशेष पॅकेज

नवी दिल्ली – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विदर्भातील शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मंजूर करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयात झालेल्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 985 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला आज मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली.

या विषेश पॅकेजमुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्‍यांना अंदाजे 30 ते 40 हजार रुपये मिळणार आहे. यातील 20 कोटी रुपये हे केवळ लहान मुलांसाठी असणार आहेत. केंद्राकडून जाहीर झालेले हे विशेष पॅकेज नागपूर, अमरावती या विभागासाठी देण्यात आले आहे.

अकोला येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आयोजित शेतकरी मेळाव्यात पवारांनी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या विदर्भातील पीडित शेतकर्‍यांना मदत होईल असा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल असे सांगितले होते.

Leave a Comment