सचिनच्या नावाला शिवसेनेचा विरोध

मुंबई – मुंबईतील कांदिवली संकुलाला सचिन तेंडुलकरचे नाव देण्याच्या प्रस्तावाला राजकीय वळण मिळाले आहे. सचिनचे नाव देण्याची घोषणा एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी काल केली तर हा पालिकेचा भूखंड असल्याने हा अधिकार महापालिकेचाच असल्याचे सत्ताधारी शिवसेनेने सांगून प्रकरणाला नवे वळण दिले आहे.

या राजकीय कुरघोडीत नामकरणाचा हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी या संकुलाला सुनील गावसकरांचे नाव देण्याची मागणी उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केली होती. मात्र आता सचिन तेंडुलकरचे नाव देण्यावरून हा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनला म्हणजेच एमसीएला कांदिवली संकुलासाठी दिलेला भूखंड हा मुंबई महापालिकेने दिला आहे. त्यामुळे त्या संकुलाचे नामकरण करण्याचा अधिकार हा मुंबई महापालिकेचा आहे. एमसीएचा नाही अशी भूमिका महापालिकेचे सभागृह नेता यशोधर फणसे यांनी मांडली.

फणसे यांनी महापौर सुनील प्रभू यांना तसे पत्रही लिहीले आहे. फणसे यांनी सचिन तेंडुलकरच्या नावाला उघड उघड आक्षेप घेतला नसला तरी कांदीवली संकुलाला सचिनचे नाव देण्याविषयी त्यांनी उघडपणे हरकत घेतली आहे. मुंबई महापालिकेच्या मालकीच्या भुखंडावरच्या कोणत्याही वास्तूला कोणाचे नाव द्यायचे हा अधिकार पालिकेचा आहे, अशी भूमिका फणसे यांची मांडली आहे.

Leave a Comment