शस्त्रक्रियेनंतर अण्णा राळेगणला परतले

पुणे – ज्येष्ठ समाजसेवक व भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने प्रणते अण्णा हजारे छोट्या शस्त्रक्रियेनंतर आपल्या गांवी म्हणजे राळेगण सिद्धीला परतले आहेत. अण्णांची प्रकृती एकदम ठीक असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सागितले गेले आहे.

गेल्या आठवड्यात अण्णांना येथील जोशी रूग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांना पोटात दुखण्याचा व लघवीचा त्रास होत होता. केलेल्या सोनेग्राफी तपासण्यात अण्णांची प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याचे लक्षात आल्यानंतर तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर एक दिवस त्यांना आयसीयू मध्ये ठेवले गेले मात्र त्यांची तब्येत चांगली असल्याने दुसरे दिवशीच त्यांना खासगी वॉर्डमध्ये हलविले गेले असे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

अण्णांना गेले काही दिवस अशक्तपणा जाणवत होता. मात्र आता त्यांची तब्येत एकदम चांगली असून ते राळेगण सिद्धीला परतले आहेत असे अण्णांच्या सहकार्‍यांनी सांगितले.

Leave a Comment