मुंबई – पाकिस्तानी गायक अदनान सामी याने १० लाख रूपयांची करचुकवेगिरी केल्याच्या कबुलीनंतर कर खात्याच्या सेवा कर विभागाने मुंबईत राहात असलेल्या सर्व पाक कलाकार व गायकांच्या फायली उघडल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

व्हिसा मुदत संपल्यावरही भारतात राहिल्याबद्दल अदनान सामीला यापूर्वीच नोटिस देण्यात आली होती. मंगळवारी सामीची कर कार्यालयात चार तास चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने १० लाख रूपयांचा सेवा कर भरला नसल्याचे मान्य केले. आपल्याला ज्यांनी कार्यक्रम ठरविला त्यांनी पैसे न दिल्याने हा कर भरला नसल्याचे सामी याने सागितले तसेच देशात केलेल्या १२ कार्यक्रमांच्या पोटीचा करही भरला नसल्याचे त्याने कबूल केले. येत्या दोन दिवसांत सर्व कर भरेन असेही त्याने अधिकार्यांना सांगितले आहे.
सामीच्या अनुभवावरून शहाण्या झालेल्या कर विभागाने मबईतील सर्वच पाक कलाकार आणि गायकांची चौकशी सुरू केली या लोकांनीही करोडो रूपयांची करचुकवेगिरी केली असावी असा संशय असल्याचे कर विभागाचे उपायुक्त समीर वानखेडे यांनी सांगितले. त्याचा शोध घेण्यासाठी या कलाकारांच्या फायली कर विभागाने तपासायला सुरूवात केली आहे मात्र या कलाकारांची नांवे सांगण्यास वानखेडे यांनी नकार दिला. दोषी आढळणार्या सर्व कलाकारांना समन्स बजावली जातील असे त्यांनी स्पष्ट केले.