मी ऑनलाइन खरेदी करते- करीना कपूर

बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर ही ख्ररेदीसाठी कधीच बाहेर पडत नाही. ती घर बसल्या आरामत सर्व वस्तूंची ऑनलाइन खरेदी करीत असते. ऑनलाईन खरेदीमुळे वेळीची तर बचत होते, त्या शिवय हवी आहे तीच वस्तू आपल्याला घर बसल्या मिळत असल्याने ऑनलाईन खरेदी करणेच मला पसंत पडते, असे मत करीना कपूरने व्यक्त केले.

नुकतेच करीना कपूरच्या हस्ते मुंबईतील एका ऑनलाइन स्टोरचे उद्घाटन करण्याात आले. यावेळी बोलताना करीना म्हणाली, ” मला खूप दिवसांपासून ऑनलाइन खरेदी करण्याची सवय लागली आहे. मी इंटरनेटच्या माध्यमातून खूप वस्‍तूची खरेदी करते. या ऑनलाईन खरेदीमुळे दुकानवर जान्यासाठीचा आणि त्याठिकाणी खरेदी करण्यासाठी लागत असलेला वेळ वाचतो. माझयासाठी हा चांगला अनुभव आहे.”

मी ज्यावेळी घरात आराम बसून ऑनलाइन खरेदी करीत असते. त्यावेळी मी खूप वस्तूंची खरेदी करते. जास्त वेळ मिळत असल्याने मी घरातून कधी कधी जास्त वस्तू देखील खरेदी करते. त्यामुळे मला आता याबाबत आवड निर्माण झाली असल्याचेही यावेळी बोलताना करीनाने स्पष्ट. केले. आगामी काळात करीना पुनीत मल्होत्राच्या ‘गोरी तेरे प्यार में’ या सिनेमात इमरान खान सोबत काम करीत आहे. हा सिनेमा २२ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे.

Leave a Comment