अॅपलने सादर केला नवा आयपॅड एअर

सॅनफ्रान्सिस्को – अॅपलने त्यांच्या सर्वाधिक विक्री होत असलेल्या फुलसाईज टॅब्लेट मध्ये थोडे बदल करून नवा आयपॅड एअर टॅब्लेट बाजारात सादर केला आहे. सुधारित हायडेफिनेशन डिस्प्लेसह सादर केलेला हा टॅब्लेट वजनाला अतिशय हलका, अगदी सडपातळ आणि अतिशय फास्ट आहे. याचे वजन केवळ ४५० गॅम इतकेच आहे. या टॅब्लेट सोबतच अॅपलने त्यांचा अपग्रेडेड आयपॅड मिनी टॅब्लेटही बाजारात उतरविला आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष फिल शिलर यासंदर्भात म्हणाले की अॅपलनेने पूर्णपणे नव्या पद्धतीचा मोबाईल अनुभव ग्राहकांना दिला आहे. नवा आयपॅड एअरही त्याला अपवाद नाही. नवीन आयपॅड अॅपलने विकसित केलेल्या अे ७ चीपसह असून हा टॅब्लेट अमेरिकेतील ग्राहकांना ४९९ डॉलर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. नवा आयपॅड मिनी ३९९ डॉलर्समध्ये उपलब्ध होणार असून ही दोन्ही व्हर्जन १ नोव्हेंबरपासून जगभरातील विविध देशात विक्रीसाठी येतील.

आयपॅडची ही दोन नवी उत्पादने जुन्या उत्पादनांसह बाजारात येत आहेत व त्याचवेळी अॅपलने आपल्या जुन्या आयपॅडच्या किमतीही उतरविल्या आहेत. टॅब्लेट क्षेत्रात सर्वाधिक विक्रीचा मान अॅपलकडे असला तरी तुलनेने त्यांचा मार्केट शेअर मात्र कमी आहे.

Leave a Comment