सोनेरी स्वप्नासाठी तीन दिवसांत 102 सेंमी खोदकाम!

उन्नाव- उन्नावमध्ये जमिनीखाली 1000 टन सोने आहे दडले आहे, असा दावा होत आहे. एका साधूच्या स्वप्नात हे दिसल्यावर पुरातत्व विभागाने उन्नावच्या किल्ल्यात खोदकामाला सुरूवात केली आहे.

गेल्या चार दिवसांपासून खोदकाम केल्यावर पुरातत्व विभागाच्या टीमचे फावडं एका मोठ्या दगडाला आपटले.. मात्र सावधानतेने 102 सेंमी पर्यंत खोदकाम केल्यावर खाली फक्त एक मोठी भिंत मिळाली आहे. खोदकाम पूर्ण होण्यास साधारणतः 1 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

पुरातत्व विभागाचा खोदकामाचा वेगही मंद आहे. कारण जमिनीखाली दडलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या ऐतिहासिक ऐवजाला धोका पोहोचवायचा नाही. 3 दिवसांत फक्त 102 सेंटीमीटरचे खोदकाम झालें आहे. एकीकडे खोदकाम सुरू आहे. तर राजा रामबक्शच्या या किल्ल्याला आता जत्रेचे स्वरूप आले आहे.

त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खोदकाम करताना एएसआयच्या टीमला जमिनीखाली काही जुनी भांडीही मिळाली आहेत. 4 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे खोदकामावर लक्ष ठेवण्यात येते आहे.