‘बिग बॉस’मधून शिल्पा सखलानी बाहेर

छोटया पडदयावरील अभिनेत्री शिल्पा सखलानी ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून बाहेर पडली आहे. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडणारी शिल्पा ही पाचवी सेलिब्रिटी ठरली आहे. ‘क्यूकी सास भी कभी बहू थी’ या प्रसिद्ध मालिकेतून नावारूपास आलेली शिल्पा ही कोणत्याही भांडण किंवा वादात नसल्यामुळे आपण शोमधून लवकर बाहेर पडल्याचे तिचे म्हणणे आहे.

या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेत कामिया पंजाबी, व्हीजे अँण्डी, तनिशा मुखर्जी आणि अरमान कोहली यांचीदेखील नावे होती. पण, शनिवारी झालेल्या अॅलिमिनेशनमध्ये सलमान खानने शिल्पाचे नाव घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

‘बिग बॉस’ च्या् सातव्याब सिझनमधून रिअॅलिटी शोमधून यापूर्वी हेजल किच, अनिता अडवाणी, रतन राजपूत, रजत रावाली या शोमधून बाहेर पडले आहेत. आता आतमध्येी असलेल्याल दहा स्पूर्धकात खरी रेस आहे. यामध्येय आता विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. स्पर्धा पुढे जाईल त्याप्रमाणात दररोज वादाला तोंड फुटणार आहे.

Leave a Comment