मुंबई- कमी वेळात दुप्पट पैसे मिळण्याचच्यार आमिषाला आता अभिनेता अक्षय खन्ना सुध्दा बळी पडला आहे. अभिनेता अक्षय खन्नाला एका कंपनीने दुप्पाट पैसेचे अमिष दाखवून पन्नास लाखांचा गंडा घातले आहे. घसघशीत व्याजाच्या आमिषाला तो बळी पडला आणि त्याने आपले ५० लाख रुपये गमावले आहेत. अक्षय खन्नानं या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
इंटॅक्ट इमिजिएट प्रा. लि. या कंपनीचे अध्यक्ष सत्यब्रत चक्रवर्ती आणि संचालक सोना चक्रवर्ती यांनी २०१०मध्ये अक्षय खन्नाची भेट घेऊन आमच्या कंपनीत पैसे गुंतवा, काही महिन्यांत दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखवले होते. पैसे दुप्पट होणार म्हणून अक्षयही या दाव्यांना बळी पडला आणि त्याने तब्बल ५० लाख रुपये चक्रवर्तीकडे गुंतवले होते.
ठरलेल्या दिवसांनतर मूळ रकमेसह ठरलेली जादा रक्कम दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अक्षय खन्नानं अॅड. राजेंद्र धुरू यांच्यामार्फत चक्रवर्ती आणि त्याची पत्नी सोना आणि अन्य साथिदारांविरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. अक्षय खन्नाच्या या तक्रारीनुसार मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.