जग्वार लँड रोव्हरची स्पोर्टस कार पेश

मुंबई – टाटा मोटर्सची मालकी असलेल्या जेएलआर म्हणजेच जग्वार लँड रोव्हरची नवी प्रिमियम एसयूव्ही रेंज रोव्हर स्पोर्टस कार गुरूवारी भारतीय बाजारात दाखल झाली असून ती डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कारच्या किमती १ कोटी १० लाख ते १ कोटी ६५ लाख रूपयांच्या दरम्यान आहेत.

जग्वार लँड रोव्हर भारतचे उपाध्यक्ष रोहित सुरी या संदर्भात माहिती देताना म्हणाले की, नव्या मॉडेलमध्ये डिझेलसाठी ३ लिटर तर पेट्रो लसाठी ५ लिटर इंजिन असून ही नवी स्पोर्टस कार डिझाईन व अंतर्गत सुविधांच्या दृष्टीनेही ग्राहकांसाठी अतिशय आरामदायी आहे. या इंजिनमुळे इंधनबचतही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.