सलमानने केली रणबीरची टिंगल

अभिनेता सलमान खानला नेहमीच चर्चेत राहण्यारस आवडते. काही दिवसांपूर्वीच सलमानने शाहरुख खान आणि रितिक रोशन यांची टिंगल केली होती. त्यामुळे आता सलमान खानचे व पुढचे टारगेट रणबीर कपूर असणार याची सर्वांनाच कल्पना आली होती. सलमान खानने नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस सीजन -७’ च्या एक शो मध्येे अभिनेता रणबीर कपूरच्या ‘बेशरम’ या सिनेमाची खिल्लीे उडवली.

सलमान खान यावेळी सर्वांची करमणूक करीत असताना म्हणाला, रणबीरच्या ‘बेशरम’ या सिनेमाला काही जणांनी दीड स्टाार दिले होते. मात्र दोन दिवसातच एक स्टारही कमी झाला. सलमान खानच्या या कॉमेंटमुळे सर्वांची चांगलीच करमणूक झाली. मात्र यामुळे आगामी काळात वाद निर्माण होवू नये म्हणून ‘बिग बॉस’ च्या प्रड्यूसरने हा डायलॉग ऑन केला नाही.

सलमानच्या वक्तव्यामुळे लक्षात येते की, सलमानला रणबीर कपूर आवडत नाही. ‘बिग बॉस सीजन -७’ लॉन्च एपिसोडमध्ये पण सलमानने रणबीरचा उल्लेाख ‘वो नया लड़का’ असा केला होता. हे सर्व काही वक्तव्य तो कैटरीना आणि रणबीरच्या जवळीकतेमुळे करीत आहे. सलमानने रणबीरवर खुलेआम कॉमेंट केले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात कैट रणबीरच्या ७ जवळीकतेबदल काय म्हणतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment