लावाने आणला ड्युअल सिम टॅब्लेट

लावाने नुकताच बाजारात सादर केलेल्या डयुअल सिम टॅब्लेट ग्राहकांच्या पसंतीस उतरला असून कंपनीने या टॅब्लेटचे नामकरण ई टॅब असे केले आहे. हा टॅब ग्राहकांना अवघ्या १०,९९९ रूपयात उपलब्ध होणार आहे. या टॅबवर थ्री जी व्हिडीओ कॉलिंग सुविधाही देण्यात आली आहे.

लावाचा ईटॅब आयव्हरी चार जीबी स्टोरेजचा असून ही स्टोरेज क्षमता ३२ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. सात इंची डिस्प्ले, अँड्राईड ऑपरेटिग सिस्टीम, दोन मेगा पिक्सल कॅमेरा व ०.३ मेगा फ्रंट कॅमेरा अशी याची अन्य वैशिष्ठ्ये आहेत.