दीपिका करतेय आता रणवीरचे कौतुक

अभिनेत्री दीपिका पादूकोन हिची यापूर्वीची अभिनेता रणबीर कपूर आणि उदयोगपती सिद्धार्थ मल्ल्या यांच्याबरोबरचे प्रेमप्रकरण गाजले होते. हे दोन्ही प्रेम प्रकरणे संपुष्टात आल्यानंतर दीपिकाने आपल्या कारकिर्दीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते.’कॉकटेल’, ‘रेस २’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ असे एका पाठोपाठ एक सुपरहीट सिनेमामुळे तिने बॉलिवूडमध्ये स्थान कायम केले आहे. आता गेल्या काही दिवसांपासून ती अभिनेता रणवीर सिंगचे तोंडभरून कौतूक करीत असल्याने ती आता रणवीरच्या प्रेमात पडली की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

संजय लीला भन्साळीच्या आगामी काळात येत असलेल्या ‘रामलीला’मधून दीपिका आणि रणवीर सिंग ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर आणायचे ठरविले. भन्साळींच्या दिग्दर्शिक ‘मॅजिक’मुळे असेल पण पडद्यावर आणि पडद्याबाहेरही दीपिका-रणवीर यांची ‘केमिस्ट्री’ रंगली आहे. सिनेमात पहिल्यांदाच एकत्र येऊनही दीपिकाला रणवीर एवढा आवडला आहे की त्याचे कौतुक करताना ती थांबतच नाही. ‘रामलीला’मध्ये खरे म्हणजे रणवीरपेक्षा अभिनेत्री म्हणून दीपिकाचे पारडे जड आहे.

रणवीरला चार सिनेमे पूर्ण होऊनही यशाचे हे गणित जमवता आलेले नाही. रणवीर सिंग सध्या इंडस्ट्रीतला आवडता कलाकार असला तरी एक ‘लुटेरा’ वगळता त्याला सोलो हीट सिनेमा देता आलेला नाही. ‘रामलीला’ हा रणवीर सिंगच्या दृष्टीने फार महत्त्वाचा चित्रपट आहे. मात्र असे असतानाही रणवीर हा सगळ्यात चांगला अभिनेता असल्याची कौतुकाची पावती दीपिकाने दिली आहे.

Leave a Comment