एचटीसीने भारतात लाँच केला ’एचटीसी वन मिनी’ स्मार्टफोन

मुंबई – जगातली आघाडीची स्मार्ट फोन बनवणारी कंपनी एचटीसीने आपला नवीन फोन एचटीसी वन मिनी’ भारतात लाँच केलाय. एचटीसीचा बिग बजेट स्मार्टफोन एचटीसी वन’ च्या धर्तीवरच हा नवा स्मार्टफोन कंपनीने बाजारात आणलाय. एचटीसी वन मिनी’ या स्मार्ट फोनची बॉडी आणि लुक एचटीसी वन’ मिनी प्रमाणेच ठेवण्यात आला आहे.

एचटीसी वन मिनी’मध्ये अंड्रोईड जेली 4.3 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. तसंच यात अतिशय पावरफुल असा 1.4 गिगाहर्ट्सचा ड्युअल कोर प्रोसेसर आहे. याला 4.3 इंचाची हाय डेफिनेशन टच स्क्रीन आहे, तर याची बॉडी अ‍ॅल्युमिनियमची आहे. फोटोसाठी या मोबाईलमध्ये अत्याधुनिक असा अल्ट्रापिक्सेल तंत्रज्ञान असलेला 2 मेगा पिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून त्याला बीएसआय सेन्सर पण आहे. त्यामुळे या कॅमेर्‍यातून 1080 पिक्सेल रेझोल्यूशनचे व्हिडीओही काढता येणे शक्य होणार आहे. या मोबाईलचा याचा फ्रंट कॅमेरा 1.6 मेगा पिक्सेलचा आहे. एचटीसी वन मिनी’ हा स्मार्टफोन भारतात 36,790 रुपयांना उपलब्ध होणार आहे.