प्रियांका गांधी प्रचार करणार ही केवळ अफवा – अजय माकन

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून प्रियांका गांधींना मैदानात उतरवले जाणार आहे. मोदींविरोधात प्रियांका देशभरात प्रचार करणार असल्याच्या चर्चेला सोमवारी उधाण आले होते. मात्र या वृत्तात काहीच तथ्य नसून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी दिले आहे.

या अफवा मध्यप्रदेशमधल्या भारतीय जनता पक्षाच्या अपयशाला दडपण्यासाठी पसरवण्यात आल्याचे माकन म्हणाले. सोमवारी सकाळी सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त पसरवण्यात आले की मोदींचा झंझावात थोपवण्यासाठी प्रियांका देशभर प्रचार करतील. आत्तापर्यंत प्रियांका या राजकारणात सक्रीय नव्हत्या. त्या फक्त उत्तरप्रदेशमध्ये रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघात आई सोनिया गांधी आणि भाऊ राहूल यांच्या प्रचार सभेत सहभागी व्हायच्या.

येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्येही प्रियांका संपुर्ण देशभरात प्रचार करणार आहेत. लोकसभा तयारीची पहिली सभा नंदूरबार येथे घेणार असल्याचाही चर्चा होती. मात्र प्रियांका गांधींच्या प्राचाराच्या बातमीत काही सत्यता नाही. मध्यप्रदेशमधील भाजपच्या अपयशावरुन लक्ष हटवण्यासाठी ही बातमी पेरली गेली आहे. यामुळे ही निव्वळ अफवाच असल्याचे माकन यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment