फायलिन चक्रीवादळाची तीव्रता कमी; जीवित हानी टळली

गोपालपूर – ओरिसाच्या गोपालपूर किनारपट्टीला ताशी २०० किमीच्या वेगाने शनिवारी रात्री धडकलेल्या फायलिन चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी आठच्या सुमारास गोपालपूरमध्ये वा-याचा ताशी वेग ९० ते १०० किमी होता. वादळाचा सामना करण्यास प्रशासन आधीपासून सज्ज असल्याने या वादळात मोठया प्रमाणावर जीवीत व वित्तहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने वादळामुळे नेमके किती नुकसान झाले याचा आढावा घेण्यास आता सुरुवात केली आहे. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फायलियन वेग मंदावण्यास सुरुवात झाली. ताशी २१० किमी वेगाने आलेले हे वादळ सहातास भारतीय किनारपट्टीवर राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

वादळामुळे मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली नसली तरी, किना-यावरील अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत तसेच विजेचे खांबही कोसळले आहेत. रात्री वाहणा-या सोसाटयाच्या वा-यामुळे किना-याजवळील हॉटेल आणि घरांचेही नुकसान झाले आहे. वादळाचा प्रभाव ओसरला असला तरी, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही.

Leave a Comment