गेल्याा काही दिवसांपासून अभिनेत्री रवीना टंडन फिल्मकार अनुराग कश्यपच्यार आगामी काळात येत असलेल्याय ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात रवीना टंडनने छोटीसी भूमिका केली आहे. या शुटिंगचे काही अंश पाहिल्यानंतर रवीना म्हणाली की, ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमाचे कथानक वेगळे असल्याकारणाने हा सिनेमा आगामी काळात हिट होईल.
येत्या काळात फिल्मकार अनुराग कश्यपच्याा दोन सिनेमात रवीन काम करीत आहे. यावेळी रविना म्हणाली, ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमाचे थोडेसे शूट पूर्ण झाले आहे. तसे पाहिले तर या सिनेमात माझी मोठी भूमिका नाही. माझी एक छोटी-सी भूमिका आहे. या सिनेमात मी निर्माता करन जौहर सोबत दिसणार आहे.
‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमातील भूमिका आव्हाानात्मडक आहे. या सिनेमात काही वेगळेपणा आहे. तो मला आवडला असून त्यासमुळेच आगामी काळात हा सिनेमा हिट होईल् असे मला वाटते. यामध्येआ करीत असलेले काम गौरवास्पिद आहे. अनुरागची आगामी काळात येत असलेला दुसरा सिनेमातील माझी भूमिका वेगळी असल्या्ने सध्याल मी त्या कामावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे रवीना म्हणाली. ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमात रवीनाशिवाय मुख्य भूमिकेत रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा दिसणार आहेत तर फिल्मकार करन जोहर नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे.