राज, उद्धव यांनी एकत्र यावे- मनोहर जोशी

मुंबई- आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि यांनी एकत्र यायला हवे, या भूमिकेचा पुनरुच्चार करत मी राजकारणातून निवृत्त होणार नाही, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केले.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना आपल्या मताचा पुनरउच्चार केला. दादरमध्ये पराभव का झाला, यावरही मनोहर जोशींनी टिप्पणी केली की, जिथे शिवाजी तिथे सूर्याजी पिसाळ, अशा शब्दात त्यांनी आपल्या पराभवाला जबाबदार असणा-यांना टोला लगावला आहे.बाळासाहेबांसारखं नेतृत्व असतं, तर एव्हाना स्मारक झालं असतं, असं म्हणत मनोहर जोशींनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच टोला हाणला. स्मारकाच्या मुद्द्यावरुन बाळासाहेबांनी सरकारही पाडले असते, असे मनोहर जोशी म्हणाले. त्याचबरोबर बाहेरचा उमेदवार दिला म्हणूनच दादरमध्ये शिवसेनेचा पराभव झाला, असे म्हणत मनोहर जोशींनी उद्धव ठाकरेंचे कानही टोचलेत.

दरम्यान मनोहर जोशींच्या स्मारकाबद्दलच्या विधानानंतर भरतकुमार राऊतांनी प्रतिवाद केला आहे. ही स्मारकाबाबत सारवासारव असल्याचे म्हटले आहे. बाळासाहेबांची शिकवण होती, आदेशाची वाट पाहू नका. त्यांचे स्मारक व्हायला पाहिजे. शिवसेनाप्रमुखांच्याब स्मा रकासाठी सर्वांनी एकत्रित मिळून लढा दिला पाहिजे.