
न्यूयॉर्क – तालिबानी हल्ल्यातून बचावलेली पाकिस्तानातील लहानगी समाजसेविका मलाला युसूफझाई हिने पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो या माझ्या आदर्श आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मला वाटचाल करायची आहे आणि एक दिवस पंतप्रधान व्हायचे आहे,’. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मलालाने हा मनमोकळा संवाद साधला. मुलींच्या शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मलाला युसफझईवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यातून बचावल्यानंतरही मलालाने तिचं कार्य सुरुच ठेवले आहे. तिच्या या असाधारण कार्याबद्दल तिचा समावेश शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारांच्या नामांकनांमध्येही करण्यात आला आहे.
