
ओस्लो – जागतिक स्तरावर रासायनिक शस्त्रास्त्र निर्मूलनासाठी काम करणा-या ओपीसीडब्ल्यू या रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंधक संघटनेला यंदाचा 2013 सालचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी दुपारी पत्रकारपरिषदेत नोबले समितीने शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी ओपीसीडब्ल्यूचे नाव जाहीर केले. या पुरस्कारासाठी पाकिस्तानच्या मलाला युसूफझाई आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची नावे चर्चेत होती.
