बॉलीवुडमधील देशी गर्ल म्हणून परिचीत असलेल्या प्रियंका चोप्रामुळे सध्या दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून खूपच परेशान आहे. त्यायचे कारण म्हणजे आगामी काळात येत असलेला “रामलीला” हा सिनेमा आहे. संजय लीला भंसाळीच्या “रामलीला” या सिनेमात प्रियंका आइटम सॉग करीत आहे. त्याचीच काळजी आता दीपिकाला वाटत आहे.
काही दिवसापूर्वीच या गाण्याचे फस्ट लुक बाजारात आला आहे. प्रियंका आणि तिच्या टेटूने सर्वांना घायळ केले आहे. यामध्ये खूपच हॉट आणि सेक्सी प्रियंका दिसत आहे. त्यामुळे प्रियांकाचे हे आयटम सॉग या सिनेमात भाव खावून जाणार असे आतापासूनच दिसत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका चिंतीत झाली आहे.
तसे पाहिले तर दीपिकाने सुध्दा आतापर्यंत तीच्या मादक डोळयांनी अनेकांना घायळ केले आहे. आगामी काळात येत असलेल्या सिनेमासाठी दीपिकाने खूपच कष्ट घेतले आहे. अचानक या सिनेमातील आयटम सॉगमुळे सिनेमाचे सर्व क्रेडिट प्रियंकाला मिळू नये यासाठी ती प्रयत्नशील आहे. या सिनेमाचे सर्व श्रेय दीपिकाला मिळणार की प्रियंकाला हे मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर समजणार आहे. त्यामुळे आगामी काळात दीपिका आणि प्रियंकाची दोस्ती कायम राहते की नाही हे लवकरच समजून येईल.