सचिन तेंडुलकर होणार निवृत्त

मुंबई – विक्रमवीर सचिन तेंडुलकर पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होणा-या दोन कसोटीनंतर निवृत्त होणार आहे. बीसीसीआयने ट्विटरवरून काही वेळापूर्वीच ही घोषणा केली आहे. सचिनची 200वी कसोटी शेवटची असेल असे बीसीसीआयने ट्विट केले आहे.

क्रिकेट खेळणे हेच स्वप्न मी लहानपणापासून बाळगले आहे आणि गेले 24 वर्ष दररोज पूर्ण करत आलो आहे. क्रिकेटपासून दूर राहण्याचा मी विचारच करू शकत नाही कारण वयाच्या 11व्या वर्षापासून मी क्रिकेट खेळत आहे. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणारी 200वी कसोटी माझी कारकीर्दीतील शेवटची कसोटी असेल. त्यानंतर मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईन,” असे सचिनने सांगितले.

याबाबत अधिक असे की, गेली 24 वर्षे क्रिकेटच्या मैदानावर साम्राज्य गाजवणारा आणि तमाम भारतीयांसाठी क्रिकेटचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अखेर निवृत्त होणार आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून 200 वा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरणार आहे. निवृत्तीबाबत सचिनने बीसीसीआयला कळविले आहे. वेस्ट .इंडिजविरुद्ध सचिन तेंडुलकर अखेरची कसोटी खेळणार आहे.

सचिनने ट्विटरवरुन निवृत्तीबाबत सांगितले, की भारतासाठी क्रिकेट खेळावे हे माझे आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न होते. गेल्या 24 वर्षांपासून मी हे स्वप्न जगत आलो आहे. क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त आयुष्याची कल्पनाच करणे अतिशय कठीण आहे. कारण वयाच्या 11 व्या वर्षापासून मी हेच करत आलो आहे. भारतासाठी खेळेणे हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान होता. मी बीसीसीआयचे आभार मानतो. बीसीसीआयने मला भरपूर दिले. निवृत्त होण्यासाठी हीच वेळ असल्याचे मला वाटले. त्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी सहमती दिल्याबद्दलही मी बीसीसीआयचे आभार मानतो. संयम आणि समजूतदारी दाखवणा-या माझ्या कुटुंबियांचेही मी आभार मानतो. माझे तमाम चाहते आणि शुभेच्छुकांचेही मी आभार मानतो.

 

Leave a Comment