मुंबई- अर्वाच्य भाषेत पोलिसांना शिवीगाळ करणा-या मॉडेल अंजुम नायरला मंगळवारी अंधेरी कोर्टात हजर केले जाणार आहे. तिच्या घरी समजावून सांगण्यावसाठी गेलेल्यान पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी अंजूम नायरला सोमवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती. ही मॉडेल त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होती, असेही पोलिसांच्याल चौकशीत निष्पन्न झाले आहे.
अंधेरी पश्चिमेतील समर्थ आंगण या इमारतीच्या २०व्या मजल्यावरून सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास साऊंड सिस्टिमचा खूप आवाज येत होता. इमारतीतल्या रहिवाशांनी होत असलेल्या त्रासाबद्दल पोलीसांनी तक्रार केली असता घरी आलेल्या पोलिसांनी अंजुम नायरने शिवीगाळ केली. पोलीस आयुक्तांना अरेतुरे करत शिव्यांची लाखोली वाहिली.
रात्री या मॉडेलला दंड आकारून सोडण्यात आले होते. तिच्या वर्तणुकीची व्हिडीओ क्लिप मोबाईल आणि सोशल नेटवर्किंग साइटवरून प्रसारित झाल्यानंतर या मॉडेलला पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी तिला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.