कतरीना झळकणार रितीकसोबत

गेल्या काही दिवसांत सलमान, शाहरुखसोबत काम केल्यानंतर आता ती ‘धूम – थ्री’ मधून अमीर खान सोबत रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. धूममध्ये ती अक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. कतरीनाने आगामी काळात ऋतिक रोशनसोबत ती एका नव्या सिनेमातून लवकरच झळकणार आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये ऋतिक रोशनबरोबर तिची केमिस्ट्री चांगलीच जमली होती. हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा पहायला मिळणार आहे.

२००३ मध्ये जेव्हा तिचा ‘बूम’ हा पहिलाच सिनेमा आला तेव्हा ती बॉलिवूडमध्ये तिला एवढे यश मिळेल याची कुणी कल्पनाही केली नसेल. पण आज तिने आपल महत्त्व सिद्ध केले आहे. खरं तर तिच्या अभिनयाची अद्याप कसोटी लागली नाही. मात्र, तिच्या सिल्व्हर स्क्रिनवरचा अपिअरन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. बूमच्या अपयशानंतर कतरीनाने काही दक्षिणात्य सिनेमात काम केलं होते.

अभिनेता अक्षय कुमारसोबत तिचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला खरा मात्र पुढे हीच जोडी हिट ठरली. अक्षयकुमारसाठी तर ही लकी गर्ल ठरली. आज ती ‘पापाराझी’ची लाडकी आहे. सलमान, शाहरुख आणि अमीर या बॉलिवूडमधील तीन खानसोबत काम करण्याची प्रत्येक ‘न्यू कमर’ची हिरोईनची इच्छा असते. कतरीना याबाबतीतही लकी ठरली आहे. आगमी काळात ऋतिक रोशनसोबत ती एका नव्या सिनेमातून लवकरच झळकणार आहे.

Leave a Comment