रत्नागिरीत पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न

रत्नागिरी: सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलिसास दोन अज्ञांत व्यक्तींनी त्यांच्यावर ज्वालाग्राही पदार्थ फेकून पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसाला जिवंत जाळण्याचा हा धक्कादायक प्रकार रत्नागिरी शहरात घडला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सुरक्षा शाखेत कार्यरत असलेले एच. आर. पेवेकर यामध्ये जखमी झाले आहेत. पेवेकर ९० टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हा प्रकार रत्नागिरी शहराच्या कुवारबाव पॉवर हाऊस जवळ घडला आहे. पेवेकर सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्यावेळी दोन व्यक्तींनी त्यांच्या अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतला आणि त्यांना पेटवून दिले, असा जवाब पेवेकर यांनी दिला आहे.

हा सर्व प्रकार रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यावरच घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या परिसरात मॉर्निंग वॉक करित असलेल्या नागरिकांनी जमादार पेवेकर यांना तत्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुगणालयात दाखल केले आहे. दरम्यातन, पेवेकर यांनी दोन संशयितांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. रत्नागिरी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.