नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने 2012-13 या वर्षासाठी रेल्वे कर्मचार्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. दसरा येण्याआधी हा बोनस रेल्वे कर्मचार्यांच्या हातात पडणार आहे.
रेल्वे कर्मचार्यांना 78 दिवसांचा पगार बोनस
राजपत्रित कर्मचार्याशिवाय इतर पात्र कर्मचार्यांना हा बोनस (पीएलबी) देण्यात येणार आहे. या बोनसचा फायदा 12 लाख 37 हजार कर्मचार्यांना होणार आहे. कर्मचार्यांना 78 दिवसांचा पगार हा विशेष बोनस सारखा आहे.
आर्थिक वर्षात रेल्वेची चांगली कामगिरी झाली आहे. कर्मचार्यांचा उत्साह आणखी द्वीगुणित व्हावा हा या मागील हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान रेल्वे युनियनने मागील वर्षी दिवसांपासून 78 दिवसांच्या बोनसची मागणी केली होती. रेल्वेचे 13 लाख 26 हजार कर्मचारी आहेत, त्यापैकी 1 लाख 26 हजार कर्मचार्यांना हा बोनस लागू होणार नाही.
