इमरान-करीनाचा ‘बदतमीज दिल’ पुढील वर्षी

बॉलीवूडमधील फेमस अभिनेता इमरान हाशमी आणि अभिनेत्री करीना कपूर या दोघांचा ‘बदतमीज दिल’ या सिनेमाची शूटिंग ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार होती. काही कारणामुळे या सिनेमाची शुटिंग सुरू झाली नसून पुढच्या महिन्यापासून या सिनेमाची शुटिंग सुरू होणार आहे. त्यामुळे ‘बदतमीज दिल’ हा सिनेमा आता पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एकता कपूर आणि करण जौहर मिळून हा सिनेमा तयार करीत आहेत. या सिनेमाला थोडासा वेगळा टच असल्याकारणाने करीना कपूर आणि इमरान हाशमी यांची निवड करण्यात आले आहे. त्यामुळेच या सिनेमोच नाव ‘बदतमीज दिल’ असे ठेवण्यात आले आहे. करीनाने या सिनेमासाठी ऑक्टोबर महिन्याची डेटस दिली होती. मात्र हा सिनेमा वेळेवर सुरू न झाल्याने तिने करण मल्होत्राच्या ‘शुद्धि’ या सिनेमाचे शुटिंग सुरू केले आहे. तर तिकडे अभिनेता इमरान हाशमीने कुणाल देशमुखच्या आगामी काळात येत असलेल्या ‘शातिर’ या सिनेमाचे काम सुरु केले आहे.

या सिनेमाचे डायरेक्टर अक्षय राव म्हणाले, ‘माझ्या करियरमधील हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे स्क्रिप्ट लिहण्याचे बरेचसे काम अजून बाकी आहे. सर्व काही फायनल झाल्यानंतर आगामी काळात या सिनेमाच्या प्रॉजेक्टचे काम सुरू करण्यात येणार आहे. ‘बदतमीज दिल’ हा एक रोमांटिक सिनेमा आहे. या सिनेमाची शूटिंग मुंबई आणि दिल्ली मध्ये आगामी काळात सुरू करण्यात येणार आहे.

Leave a Comment