जम्मू – पाकिस्तान सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातल्या मेंढर सेक्टर येथे पाकने गोळीबार सुरू केला. तासभर हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात कसल्या च प्रकारची भारताची हानी झालेली नाही, असे संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने स्पष्टर केले आहे.
एकीकडे रविवारी न्यूयॉर्कमध्ये मनमोहन सिंह आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांची भेट झाली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या भेटीत सीमेपलीकडील दहशतवाद थांबविण्यासंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नवाझ शरीफ यांना फटकारले होते. पंतप्रधान भारतात परतताच पाकिस्तानने पुन्हा हा हल्ला केला आहे.
या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही चोख उत्तर दिले. ऑगस्ट महिन्यात पाक सैन्याने भारतीय लष्करातील पाच जवानांची निघृण हत्या केल्यानंतर सीमारेषेवर अत्यंत तणावपूर्ण स्थिती असून सतत संघर्ष सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.