बिहारींना बलात्कारी म्हटल्याप्रकरणी राज ठाकरेंना वॉरंट

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बिहारच्या मुजफ्फरपूर कोर्टानं बॉडी वॉरंट जारी केलं आहे. दिल्ली गँगरेपप्रकरणी बिहारींना बलात्कारी म्हटल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर आहे.

राज ठाकरे यांना 12 नोव्हेंबरपूर्वी मुजफ्फर-पूर्व कोर्टात हजर करा, असा आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे. बॉडी वॉरंट म्हणजे जर राज ठाकरे कोर्टात हजर राहिले नाहीत, तर तो कोर्टाचा अपमान समजून त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु होईल. विशेष म्हणजे या अगोदरही राज ठाकरे यांच्याविरोधात मुजफ्फरपूर कोर्टानेच वॉरंट जारी केलेलं होतं.