नाशिक : मणप्पुरम गोल्ड लोनच्या नाशिक रोड शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. यामध्ये तब्बल १५ किलो सोने लंपास करण्यात आले आहे. त्या ववेळी तीन लाखांच्या रोकडवरही चोरट्यांनी डल्ला मारला .चोरीनंतर दरोडेखोरांनी पाच कर्मचा-यांना डांबून पळ काढला.

हे दरोडेखोर पोलिसांच्या वेशात आले होते. बिटको चौकातील एका शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये तिस-या मजल्यावर असलेल्या मणीप्पुरमच्या या शाखेतील सुरक्षारक्षकासह दोन महिला आणि दोन पुरुष कर्मचा-यांना दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकाने लॉकरमध्ये नेले. येथील मुद्देमाल लुटल्यानंतर दरोडेखोरांनी कर्मचा-यांना डांबून ठेवले. लॉकरची चावी घेऊन ते फरार झाले. हा सर्व प्रकार संध्याकाळी ५ च्या सुमारास झाला.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या सुरक्षा एजन्सीचा सुपरवायझर पाहणीसाठी आल्यावर त्याच्या हा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळाल्यावर डॉगस्कॉडसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातली कारवाई सुरु होती. मात्र लॉकर रुमची डुप्लीकेट चावी नसल्याने अनेक तास हे कर्मचारी लॉकर रुममध्येच अडकून पडले होते.