मुंबई: गोरेगाव येथे मंगळवारी रात्री एका मॉडेलची छेडछाड करण्यात आली आहे. रोजलिन खान असं या मॉडेलचे नाव आहे. याप्रकरणी त्यांीनी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत या प्रकरणातील कफील जाफरी या आरोपीला तत्का्ळ अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.
मंगळवारी रात्री मॉडेल रोजलिन खान आपल्या इमारातीतून कामानिमित्त बाहेर जात होती. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या कफील जाफरीने तिची छेड काढली. त्यावेळी तिने विरोध केला असता त्याने तिच्याबद़दल काही अपशब्द वापरल्याचा आरोपही या मॉडेलने केला आहे.
या घटनेनंतर मॉडेल रोजलिन खानंने गोरेगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कफील जाफरी याला ताब्यात घेतले आहे. कफील जाफरी या आरोपीला तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.