मल्लिका करणार ६३ वर्षीय वृद्धासोबत विवाह?

बॉलीवूडची हॉटबाला मल्लिका शेरावतचे केवळ तरुणच दिवाने आहेत, असा कुणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. तरुणांसोबतच मल्लिका वृद्ध-बुजुर्गांना तेवढेच घायाळ करते. टीव्हीवर मल्लिकाच्या स्वयंवर आधारित शोमध्ये सहभागी होण्यासाठी चक्क ६३ वर्षांच्या एका आजोबांनी दाखल केलेल्या नावामुळे याची प्रचीती आली. फक्त नावच दाखल केले नाही तर टॉप ३0च्या यादीतही ते समाविष्ट झाले आहेत.

हैदराबादच्या राहणार्‍या सुदर्शन नावाचे हे आजोबा या ‘शो’त मिळालेल्या प्रवेशामुळे सध्या भलतेच खूश आहेत. मल्लिकाचे मन जिंकण्यात आपण यशस्वी होऊ व या शोमध्ये मोठा पल्ला पार करू, असा त्यांना विश्‍वास आहे. गंमत म्हणजे कधीकाळी ते मल्लिकाचे शिक्षक होते व सध्या उदयपूरमध्ये आहेत. राखी सावंतच्या ‘राखी का स्वयंवर’नंतर आता मल्लिका शेरावत आपल्या स्वप्नातील राजकुमाराचा शोध घेणार आहे.

७ ऑक्टोबरपासून लाईफ ओके वाहिनीवर सुरू होत असलेल्या द बॅचलोरेट नामक शोमध्ये मल्लिका आपला जोडीदार निवडेल. या शोमध्ये अन्य स्पर्धकांसोबत टीव्हीस्टार मोहित रैनाही वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे शिरकाव करणार असल्याची चर्चा आहे. ‘देवों के देव महादेव’ मालिकेत काम करणार्‍या मोहितला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेशासंबंधी विचारणा करण्यात आली आहे. मात्र मोहित या शोमध्ये सहभागी होऊ इच्छित आहे की नाही याची अजून पुष्टी झालेली नाही. मल्लिकाचा जोडीदार बनण्याची संधी उपलब्ध करून देणार्‍या या शोसाठी देशभरातून एक लाख २७ हजार लोकांनी अर्ज केला होता, पण त्यांच्यातील फक्त ३0 लोकांचीच अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. आता त्यांच्यापैकी कोणता नशीबवान मल्लिकाच्या दिलाचा राजा होतो, याची सगळ्य़ांना उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वी मल्लिकानेही नरेंद्र मोदी देशातील सर्वात देखणे बॅचलर असल्याचे स्पष्ट आपण त्यांच्यावर फिदा असल्याची कबुली दिली होती.

Leave a Comment