सहा दशकांपेक्षा अधिक काळ जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढय़ांना गाणे म्हणजे काय, हे ज्यांच्यामुळे समजले त्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी २८ सप्टेंबर रोजी ८५ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द सर्वांसाठी प्रेरणादायीतर आहेच. त्या शिवाय सिनेसृष्टीतील ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक असा त्यांचा परिचय आहे.
२८ सप्टेंबर १९२९ लता मंगेशकर यांचा जन्म साली मंगेशकर कुटुंबात झाला. त्या भारतीय हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीत-विश्वात त्यांना ‘लता-दीदी’ म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकिर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यानंतर इ.स. १९४५ मध्ये मुंबईत आल्यावर त्यांनी उस्ताद अमानत अली खॉ ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
लता मंगेशकरांच्या यांनी आतापर्यंत ९८० पेक्षा अधिक हिंदी सिनेमाची गाणी गायली आहेत. त्यासशिवाय विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. भारताचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतत्न’ प्राप्त होणा-या गायक-गायिकांमध्ये लताबाईंचे नाव दुस-या क्रमांकावर आहे.