दीपिका-कंगना आमने सामने

बॉलीवुडचा रॉक स्टार रणबीर कपूर आणि हॉट अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा “रामलीला” १५ नोंव्हेयबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्याच दिवशी आता अभिनेत्री कंगना राणावत हिचा “रज्जो” हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे आता आगामी काळात दीपिका आणि कंगना हिचे सिनेमे समोरा-समोर येत असल्याने यामध्ये कोणाचा सिनेमा आघाडी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिकाचा “चेन्नई एक्सप्रेस” हा सिनेमा हिट झाल्या्ने दीपिकाच्या आगामी काळात येत असलेल्या सिनेमाकडून खूपच अपेक्षा आहेत. “रज्जो” या सिनेमाचे दिग़दर्शन विश्वास पाटील यांनी केले आहे. या सिनेमात अभिनेत्री कंगना (रज्जो) हिने मुजरेवालीची भूमिका साकरली आहे. “रज्जो” व “रामलीला” हे दोन सिनेमे एकचा दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज होत आहेत. हे दोन सिनेमे वेगवेगळया स्वरूपाचे असले तरी कंगना व दीपिका यांच्या भूमिकेमुळे या सिनेमांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आगामी काळात येत असलेल्या व तिच्या सिनेमाबाबत कंगनाला आत्मविश्वास आहे. याबाबत बोलताना कंगणा म्हणाली, ‘ रज्जो या सिनेमातील भूमिका वास्तवात देखील खूप जवळची आहे. या भूमिकेसाठी मी खूप कष्ट घेतले आहे. त्यामुळे हा सिनेमा आगामी काळात यशस्वी ठरेल असे मला वाटते.’ “रज्जो” या सिनेमात अभिनेत्री कंगनाशिवाय पारस अरोरा, प्रकाश राज, महेश मांजरेकर व जयाप्रदा हिने अभिनय केला आहे.

Leave a Comment