पुणे : व्हर्गो व्हाल्व्ज -कंट्रोल्स ही पुण्यातील कंपनी अमेरिकेतील अभियांत्रिकी क्षेत्रातील दिग्गज असलेल्या इमर्सन समूहाने सुमारे ४५ कोटी डॉलर किमतीला विकत घेतली असल्याचे दोन्ही उद्योगांच्या सूत्रांनी नमूद केले आहे. व्हर्गो व्हाल्व्जची उत्पादने ६० हून अधिक देशात विकली जात आणि गेल्या वर्षीची उलाढाल २५ कोटी डॉलर ची असून त्यातील ८० टक्के विक्री भारताबाहेर केली जाते.
व्हर्गो व्हाल्व्जवर इमर्सनचा ताबा
अत्यंत महत्वा च्या प्रक्रियेत वापरले जाणारे बॉल व्हाल्व्ज ही कंपनी उत्पादन करते. उर्जा आणि प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात हे व्हाल्व्ज वापरले जातात. इमर्सन चे कार्यकारी उपाध्यक्ष स्टीव्ह सोनेनबर्ग याबाबत म्हणाले की, व्हर्गो व्हाल्व्ज आमच्या ताब्यात आल्याने त्याचा भारत आणि आशियातील बाजारपेठेत भक्कम ठसा निर्माण करण्यास उपयोग होणार आहे. जागतिक व्यवसाय वाढीस याचा उपयोग होणार आहे.
व्हर्गो व्हाल्व्जचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष महेश देसाई म्हणाले की पुण्यातील कंपनीला आता इमर्सन सारख्या जागतिक ब्रान्डचा ङ्गायदा घेता येणार आहे . व्हर्गो व्हाल्व्जचे युरोप, अमेरिका आणि भारतात उत्पादन प्रकल्प आहेत. इमर्सनची वार्षिक विक्री उलाढाल २ ४ अब्ज डॉलर इतकी आहे.
