नवी दिल्ली – देशातल्या विकसित राज्यांच्या यादीत गोव्यानं सर्वात वरचा क्रमांक पटकावलाय. तर केरळनं दुसरा स्थानावर झेप घेतलीय. या यादीत महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे. देशातल्या सर्वात जास्त विकसित राज्यांमध्ये सात राज्यांची गणना करण्यात आलीय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विकासाच्या नावानं डंका पिटणा-या नरेंद्र मोदींच्या गुजरातला पहिल्या सातमध्ये स्थान पटकावण्यात अपयश आलंय.
देशातील विकसित राज्यांत महाराष्ट्र पाचवा
ओडिशा आणि बिहार देशातील सर्वात कमी विकसित राज्य असल्याचा अहवाल रघुराम राजन यांच्या समितीने दिला आहे. गरिब राज्यांना सहाय्य करता यावे यासाठी विविध राज्यांच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी या समितीची नेमणूक करण्यात आली होती. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उत्तर प्रदेश, राजस्थान अशा एकूण 10 राज्यांना कमी विकसित राज्य घोषित करण्यात आल आहे. गोवा आणि केरळ ही भारतातील सर्वात विकसित राज्य तर तामिळनाडू, पंजाब, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हरियाणा ही विकसित राज्य असल्याचे असल्याचे रघुराजन समितीने म्हटले आहे. 28 राज्यांना 3 विभागात विभागण्याची सूचना देखील या समितीने केंद्राला दिली आहे.
