लॉस एंजलेस – नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविच लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. दीर्घकाळची आपली मैत्रिण जेलेना रिस्टीक समवेत नुकताच साखरपुडा झाल्याचे त्याने सोशल मिडीयाद्वारा जाहीर केले. 26 वर्षीय नोवाकने माझ्या भविष्यातील पत्नीशी भेटा असे कॅप्शन देत दोघांचे छायाचित्र ट्विट केले आहे. रिस्टीक ही टेनिस फॅन असून नोवाकच्या सर्व सामन्यांना ती हजेरी लावत होती.
नोवाकच्या चॅरिटेबल फाऊंडेशनची ती संचालिका आहे. 2007 एटीपी स्पर्धेत नोवाक टॉप-10 मध्ये दाखल झाला. परंतु रॉजर फेडरर आणि रॅफेल नदालचा बोलबाला असल्याने त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. 2011 मध्ये त्याने नंबर वनपद मिळवले. ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन स्पर्धा जिंकून त्याने सा-यांचे लक्ष वेधले. याच महिन्यात (सप्टें.2013) अमेरिकन स्पर्धेत नदालने त्याला पराभूत केले. ऑगस्ट महिन्यात त्याचे सव्र्ह टू विनफ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.