दुबई – एक अशी कार आहे जी पाहिल्यावर तुमच्या डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही. कारण, ही संपूर्ण कार हिर्यांनी सजवली गेली आहे. ही हिरेजडित कार पाहून तुम्हालाही ती खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. मात्र, ती कार खरेदी करणं तर दूरच पण तिला स्पर्श करण्याचा नादही तुम्हाला महाग पडू शकतो. कारण या कारला एकदा स्पर्श करण्यासाठी तुम्हाला मोजावे लागतील तब्बल 65 हजार रुपये.
लिमिटेड एडिशनच्या मर्सिडीज बेंझ कार पूर्णपणे हिर्यांनी सजवलेली आहे. या हिरेजडित कारची किंमत आहे 32 कोटी रुपये. मर्सिडीजने आपल्या 50 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत ही हिरेजडित कार लॉन्च केली. यापैंकी एक कार सौदी अरबचा राजपुत्र अल-वलीद बिन तलालने खरेदी केली आहे.
मात्र मर्सिडीज कंपनीने कधी कल्पनाही केली नसेल की अरब राजपुत्र या कारला स्पर्श करण्याची फी 65 हजार रुपये असेल. हिर्यांची चमक बाजूला ठेवली तर इतर कोणत्याही कारप्रमाणे ही कार रस्त्यावर धावू शकते.